“सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत समान निधी वाटपावरून सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या सुरेश पाटील यांनी आपल्याच पक्षाविरोधात बंड केल्याचं दिसून आलं त्यांनी निधी वाटपा दरम्यान काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांना निधी दिला गेला नाही त्यांच्यावर अन्याय का असा सवाल महापौरांना केला तेव्हा महापौरांशी सलगी करणाऱ्या श्रीदेवी फुलारे यांना हे बघवले नाही त्यांनी उलट सुरेश पाटलांना ओ अण्णा आमच्यात भांडणे लावू नका अशा शब्दात सुनावत निधी मिळाल्याचे सांगितले”.