सोलापूर : पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील ‘एसआरपीएफ’ जवानाने गोळीबार केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील भातंबरे येथे घडली आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेत एकजण जागीच ठार झाला असून दोघेजण जखमी झाल्याचे कळते.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील भातंबरे येथे बुधवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली.नितीन बाबुराव भोसकर असे गोळीबारात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बालाजी महात्मे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सोलापूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती वैराग पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी काशिनाथ विश्वनाथ काळे वय-35 वर्षे, धंदा- ड्रायव्हर,, रा. सापनई, तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी गुरूबा तुकाराम महात्मे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 पिस्टल, 4 खाली केस व 26 जिवंत राउंड जप्त करण्यात आलीत. फिर्यादी काशिनाथ विश्वनाथ काळे व अमर जालिंदर काकडे असे दोघांना देखील गोळीबार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून वगैरे घटनास्थळी शांतता आहे, अधिक तपास पोनि विनय बहिर हे करीत आहेत.
















