एमआयएम नेते तौफिक शेख यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ते तुरुंगात गेले त्यानंतर सोलापूर शहरातील एमआयएम पक्षाची घडी विस्कटली. राजकीय समीकरणे बदलली, पक्षात फारूक शाब्दि यांचा उदय झाला, पक्षात गट पडले, एक गट तौफिक पैलवान यांचा दुसरा फारूक शाब्दी यांचा. तौफिक शेख तुरुंगातून सुटून आले, त्यांनी एमआयएम पासून दुरावा करत राष्ट्रवादीशी जवळीक साधली हे सर्व सोलापूर शहरात होत असताना नगरसेवक अझहर हुंडेकरी हे मात्र एम आय एम या पक्षाची एकनिष्ठ राहिले त्यांनी थेट वरिष्ठांशी संपर्क ठेवला,
सुरुवातीला त्यांनी फारूक शाब्दि यांच्याही जवळ न जाता पैलवानलाही सोडले नाही. मात्र आता तौफिक पैलवान हे राष्ट्रवादीत जाणार हे निश्चित झाले त्यामुळे नगरसेवक हुंडेकरी हे पैलवान पासून दूर आहेत, पक्षाचा शहराध्यक्ष म्हणून शाब्दी यांच्या ते सोबत राहत आहेत. अझहर हुंडेकरी यांनी 2017 मध्ये त्यावेळचे शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्या पॅनेलमधून महापालिका निवडणूक लढवली सर्व पॅनल चांगल्या मताधिक्याने विजयी झाले, तेव्हापासून नेता म्हणून ते पैलवान यांना मान देत असत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातून अजहर हुंडेकरी यांचे नाव जवळजवळ उमेदवार म्हणून निश्चित होते मात्र ऐनवेळी त्यांच्या बदल्यात तौफिक शेख यांच्या पत्नीला उमेदवारी मिळाली आणि परत दोनच दिवसानंतर पुन्हा उमेदवारी बदलून अमित अजनाळकर यांना देण्यात आली. तेव्हापासून हुंडेकरी हे पैलवान यांच्यावर नाराज दिसून आले.
तरीही पैलवान सुटून आल्यानंतर त्यांच्यासोबत होते मात्र आता पैलवान यांनी एमआयएम पक्षाला जवळजवळ सोडचिट्टी दिल्याचं निश्चित असून केवळ ते पक्ष कधी बदलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रभाग 21 मध्ये एमआयएम च्या चार नगरसेवकांपैकी अजहर हुंडेकरी हे आता स्वतंत्र विकास कामे करत आहेत, माझ्यासाठी एमआयएम हा पक्ष महत्त्वाचा असून माझे नेते खासदार असुद्दिन ओवेसी हेच आहेत,
शहराध्यक्ष म्हणून फारूक शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागेल असे हुंडेकरी सांगतात, त्यामुळे भविष्यात होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाने सांगितले तर पैलवानच्या विरोधात ही निवडणूक लढण्याची तयारी हुंडेकरी यांची असल्याची चर्चा आहे आणि निश्चितच आपणास पक्षाच्या एकनिष्ठतेचा आणि प्रभागात स्थानिक असल्याचा व विकास कामे केल्याचा फायदा होईल अशी अपेक्षा हुंडेकरी ठेवून आहेत.






















