“जर राष्ट्रवादी आमच्या सोबत आली तर मी भाजपच्या वतीने शब्द देतो की, पहिल्यांदा तुम्हाला विधानपरिषदेवर आमदार करणार”…. आमदार राहूल नार्वेकर (प्रवक्ता -भाजप)
महायुद्ध @ Lokmatlive मधील “ठाकरे सरकारभोवती ED/CBI चा फास” विषयावरील या चर्चेतील शेवटच्या सेगमेंट मध्ये भाजपचे प्रवक्ते राहूल नार्वेकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटलांनी एक गुगली टाकली …त्यांना विचारलं की,जर उद्या शिवसेना तुमच्या सोबत सरकारमध्ये सामील व्हायला तयार झाली तर,प्रताप सरनाईक यांची चौकशी थांबणार का? किंवा जर राष्ट्रवादी तुमच्या सोबत आली तर अनिल देशमुखांच्या वरील कारवाई थांबणार का?
पाटलांच्या या प्रश्नावर राहूल नार्वेकर फसले व भाजपाचे अंत:स्त धोरण काय आहे ते बोलून गेले.ते म्हणाले की,”जर राष्ट्रवादी आमच्या सोबत आली तर मी भाजपच्या वतीने शब्द देतो की, पहिल्यांदा तुम्हाला विधानपरिषदेवर आमदार करणार”….
या त्यांच्या उत्तरामुळे “सध्याच्या ED/ CBI च्या कारवायांचा उद्देश हा केवळ शिवसेना किंवा राष्ट्रवादीला भाजप सोबत ओढण्यासाठीचा दबावतंत्राचा भाग आहे” हे भाजपच्या प्रवक्त्याने अप्रत्यक्ष मान्य केल्यासारखेच आहे.
“जर राष्ट्रवादी भाजप सोबत सरकार बनवायला तयार झाली तर,आम्ही सीबीआय/ ईडी च्या चौकशा थांबवूच,शिवाय तुमच्या सारख्या कार्यकर्त्याला विधानपरिषदेवर सुद्धा घेऊ” असे ज्या अर्थी जाहीर Live Debate मध्ये भाजप प्रवक्ते बोलतात,त्या अर्थी सध्या जे चाललंय ते केवळ भाजपाचे पुन्हा सत्तेमध्ये येण्यासाठीचे षडयंत्र आहे हे स्पष्ट होतंय..असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील म्हणतात. पहा काय झाली चर्चा तो व्हिडीओ….


















