सोलापूर : शासनाच्या महसूल विभागाने उपजिल्हाधिकारी संवर्गच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांची बदली रायगड जिल्ह्यात जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून झाली आहे तर तहसीलदार वरून उपजिल्हाधिकारी पदावरून प्रमोशन झालेल्या अंजली मरोड यांना वर्धा जिल्ह्यात पुनर्वसन अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांनी वर्ध्यात जाऊन पदभार स्वीकारला आहे.
तत्कालीन उपविभागीय अधिकारी क्रमांक एक हेमंत निकम यांची बदली झाल्यानंतर अनेक महिन्यांपासून या ठिकाणी अधिकारी आला नव्हता सध्या महसूल उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांच्याकडे होता, त्या पदावर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले सदाशिव पडदुने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांच्या जागेवर औरंगाबाद येथील सहाय्यक आयुक्त गणेश निऱ्हाळी यांना नियुक्ती देण्यात आली आहे.



















