राज्यस्तरीय निवडणूक निविदा समितीमधील कार्याबद्दल भारत वाघमारे उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) रायगड जिल्हा यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन राज्याचे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर मधील लेखाधिकारी राजेंद्र नागणे व फारूक शेख, अव्वल कारकून, निवडणूक शाखा सोलापूर यांनाही प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सह मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य पारकर तसेच राज्यभरातील जिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी उपस्थित होते.


















