Thursday, August 7, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

उजनीच्या पाण्याचे जून महिन्यापर्यंत नियोजन ठरले ; धरण जाणार एवढ्या मायनस टक्केवारीत ; सोलापुरसाठी अतिशय महत्वाची बातमी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 November 2023
in solapur
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 




सोलापूर, दि. 3 (जिमाका):-सोलापूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अंतर्गत उजनी प्रकल्पात दिनांक 2 नोव्हेंबर 2023 अखेर 29.33 उपयुक्त पाणीसाठा तर 63.66 मृत पाणीसाठा असा एकूण 92.99 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. या उपलब्ध पाणी साठ्यातून रब्बीचे व पिण्याच्या पाण्याचे दोन आवर्तन माहे फेब्रुवारी 2024 अखेरपर्यंत पुरेसा राहील या पद्धतीने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. 


उजनी प्रकल्पातील उपलब्ध पाण्याच्या नियोजनाबाबत कालवा सल्लागार समितीच्या दूरदृश्यप्रणाली व्दारे आयोजित बैठकीत पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री बबनदादा शिंदे, संजयमामा शिंदे, समाधान आवताडे, सुभाष देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते तर जिल्हाधिकारी कार्यालय येथून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, उपजिल्हाधिकारी महसूल विठ्ठल उदमले, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता धीरज साळी, कार्यकारी संचालक श्री. कोल्हे, उजनी धरण व्यवस्थापन प्रकल्पाचे श्री. मोरे, भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. बागडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, जलसंपदा विभागाने रब्बी हंगाम 2023-24 व पिण्याच्या पाण्यासाठी उजनी प्रकल्पातून दिनांक 4 नोव्हेंबर 2023 पासून पाणी सोडणेबाबत नियोजन केले असून त्याची  काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, पाण्याचा अपव्यय होणार नाही यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे पाणी सोडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील वीज खंडित करावी जेणेकरून शेवटच्या ठिकाणापर्यंत पाणी पोहोचेल असेही त्यांनी सांगितले. 


तसेच हे पाणी आवर्तन सोडण्याचे नियोजन माहे फेब्रुवारी 2024 अखेर पर्यंत चे असून त्यानंतरचे पाणी नियोजन कशा पद्धतीने करावयाचे याबाबत जानेवारी अखेरपर्यंत कालवा समितीची पुन्हा बैठक घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.


*खरीप हंगाम 2023-24 मधील पाणी वापर –

         खरीप हंगाम 2023-24 मधील प्रत्यक्ष पाणी वापर जलाशयाच्या वरील बाजूचा पाणी वापर 6.64 खालील बाजूचा पाणी वापर 5.45 टीएमसी असा एकूण 12.09  टीएमसी पाणी वापर झालेला आहे.


*रब्बी हंगाम 2023-24 मधील प्रत्यक्ष पाणी वापर –

रब्बी हंगाम 2023-24 मधील दिनांक 2 नोव्हेंबर 2023 पर्यंतचा प्रत्यक्ष पाणी वापर हा जलाशयाच्या वरील बाजूचा 2.60 टीएमसी तर जलाशयाच्या खालील बाजूचा 0.56 टीएमसी असा एकूण 3.16 टीएमसी झालेला आहे.


उर्वरित रब्बी हंगाम 2023-24 चे पाणी नियोजन

दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी उजनी प्रकल्पातील पाण्याची पातळी 494.580 मीटर इतकी आहे तर एकूण पाणीसाठा 92.99 टीएमसी, उपयुक्त पाणीसाठा 29.33 टीएमसी तर उपयुक्त पाणी साठेची टक्केवारी 54.75 टक्के आहे, अशी माहिती प्रकल्पाचे अध्यक्ष अभियंता धीरज साळी यांनी दिली.


उजनी प्रकल्पातून दिनांक 2 नोव्हेंबर 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत जलाशयाच्या वरील बाजूचा पाणी वापर व जलाशयाच्या खालील बाजूचा पाणी वापर करण्याचे नियोजन केलेले आहे.

वरील बाजूचा पाणी वापर 11.92 टीएमसी तर खालील बाजूचा पाणी वापर 32.35 टीएमसी असा एकूण 44.27 टीएमसी इतका पाणी वापर उपरोक्त कालावधीत केला जाणार असल्याची माहिती श्री. साळी यांनी दिली. 


अ) जलाशयाच्या वरील बाजूचा पाणी वापर –

      बाष्पीभवन 2.66 टीएमसी, जलाशय उपसा सिंचन 1.72,  जलाशय बिगर सिंचन पिण्यासाठी 0.83, जलाशय बिगर सिंचन औद्योगिक 0.58, जलाशयातील गाळ 2.26,  सीना माढा उपसा सिंचन योजना आवर्तन एक व दोन 2.84 टीएमसी, दहिगाव उपसा सिंचन योजना आवर्तन एक व दोन 1.03 टीएमसी असा एकूण 11.92 टीएमसी पाणी वापराचे नियोजन दिनांक 2 नोव्हेंबर 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधी केले आहे.


ब) जलाशय खालील बाजूचा पाणी वापर नियोजन

        1.कालवा प्रवाही सिंचन आवर्तन 1( मान नदीवरील सात कोल्हापूर बंधारे व सीना नदीवरील नऊ कोल्हापूर बंधाऱ्याच्या फीडिंगसह) कालावधी 4 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर, 8 टीएमसी पाणी सोडण्यात येणार. 2.कालवा प्रवाही सिंचन आवर्तन 2- एक जानेवारी 2024 ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीत 7 टीएमसी पाणी सोडण्यात येणार. 

3. भीमा सीना जोड कालवा आवर्तन एक व दोन 4 नोव्हेंबर 2023 ते 4 फेब्रुवारी 2024 या कालावधीत 6.35 टीएमसी पाणी सोडण्यात येणार.

4. भीमा नदी आवर्तन (सोलापूर शहरासाठी) 1 डिसेंबर 2023 ते 10 डिसेंबर 2023 या कालावधीत 5 टीएमसी तर भीमा नदी आवर्तन (सोलापूर शहरासाठी  हिळ्ळी कोल्हापूर पद्धतीचा बंधाऱ्यापर्यंत 1 फेब्रुवारी 2024 ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीत 6 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे, असा एकूण 32.35 टीएमसी पाणी वापर खालील बाजूचा होणार असून जलाशयाच्या वरील व खालील बाजूचा एकूण रब्बी हंगाम पाणी वापर 44.27 टीएमसी असा राहील, अशी माहिती अधीक्षक अभियंता साळी यांनी दिली.


उर्वरित रब्बी हंगामाचे नियोजन झाल्यानंतर 29 फेब्रुवारी 2024 अखेर प्रकल्पाची पाणी पातळी ४८८.६३५ मीटर असेल तर एकूण पाणीसाठा 48.72 टीएमसी, उपयुक्त पाणीसाठा वजा 14.95 टीएमसी तर उपयुक्त पाण्यासाठी ची टक्केवारी वजा 27.90% इतकी राहील.

********

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन होणार ; समन्वयक म्हणून या अधिकाऱ्याची नेमणूक ; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Next Post

आडम मास्तर यांचे सोलापुरात शक्ती प्रदर्शन, हजारो कामगारांसमोर पुकारला यल्गार ; मराठा आरक्षणासाठी दिला जोरदार पाठिंबा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आडम मास्तर यांचे सोलापुरात शक्ती प्रदर्शन, हजारो कामगारांसमोर पुकारला यल्गार ; मराठा आरक्षणासाठी दिला जोरदार पाठिंबा

ताज्या बातम्या

सोलापुरात पोलिसांचा दणका ! माजी नगरसेवक मुलासह तडीपार

सोलापुरात पोलिसांचा दणका ! माजी नगरसेवक मुलासह तडीपार

6 August 2025
खासदार प्रणिती शिंदे आहेत संपर्कात ; उत्तराखंड ढगफुटीवर काय दिली माहिती वाचा

खासदार प्रणिती शिंदे आहेत संपर्कात ; उत्तराखंड ढगफुटीवर काय दिली माहिती वाचा

6 August 2025
ब्रेकिंग : सोलापूरचे चार पर्यटक अडकले उत्तराखंडमध्ये ; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

ब्रेकिंग : सोलापूरचे चार पर्यटक अडकले उत्तराखंडमध्ये ; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

6 August 2025
प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांच्या आरोग्य विभागाला सक्त सूचना ; थेट धाडी टाका

प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांच्या आरोग्य विभागाला सक्त सूचना ; थेट धाडी टाका

6 August 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या उपकेंद्रांच्या धोरणाबाबत सुधारित आराखडा तयार करा ; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या उपकेंद्रांच्या धोरणाबाबत सुधारित आराखडा तयार करा ; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

6 August 2025
ग्रेट दिलीप स्वामी ! सीएम देवेंद्र फडणवीस यांनी का दिली कौतुकाची थाप ; महसुलमंत्री यांचे कडून ही कौतुक..!

ग्रेट दिलीप स्वामी ! सीएम देवेंद्र फडणवीस यांनी का दिली कौतुकाची थाप ; महसुलमंत्री यांचे कडून ही कौतुक..!

5 August 2025
पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की ; अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीतील प्रकार ; गुन्हे दाखल

पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की ; अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीतील प्रकार ; गुन्हे दाखल

5 August 2025
यकृत प्रत्यारोपण तज्ञ डॉ. आदित्य कुंटे यांची शनिवारी सोलापुरात ओपीडी

यकृत प्रत्यारोपण तज्ञ डॉ. आदित्य कुंटे यांची शनिवारी सोलापुरात ओपीडी

5 August 2025

क्राईम

सोलापुरात पोलिसांचा दणका ! माजी नगरसेवक मुलासह तडीपार

सोलापुरात पोलिसांचा दणका ! माजी नगरसेवक मुलासह तडीपार

by प्रशांत कटारे
6 August 2025
0

सोलापुरात पोलिसांचा दणका ! माजी नगरसेवक मुलासह तडीपार सोलापूरच्या पोलिसांनी मोठा दणका दिला असून गोवंशय जनावरांच्या कत्तली करणाऱ्या माजी नगरसेवक...

पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की ; अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीतील प्रकार ; गुन्हे दाखल

पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की ; अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीतील प्रकार ; गुन्हे दाखल

by प्रशांत कटारे
5 August 2025
0

पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की ; अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीतील प्रकार ; गुन्हे दाखल सोलापूर : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती...

सोलापूरच्या पोलीस आयुक्तांचा मोठा दणका ; सालार गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाई

सोलापूरच्या पोलीस आयुक्तांचा मोठा दणका ; सालार गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाई

by प्रशांत कटारे
26 July 2025
0

सोलापूरच्या पोलीस आयुक्तांचा मोठा दणका ; सालार गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाई सोलापूरचे पोलीस आयुक्त राजकुमार यांनी एक मोठी कारवाई करताना...

धक्कादायक ! हॉटेल सुगरणचे मालक वाघमोडे व चालक वाघचवरे ठार ; आयशर आणि ओमनी कारचा भीषण अपघात, झाला

धक्कादायक ! हॉटेल सुगरणचे मालक वाघमोडे व चालक वाघचवरे ठार ; आयशर आणि ओमनी कारचा भीषण अपघात, झाला

by प्रशांत कटारे
22 July 2025
0

धक्कादायक ! हॉटेल सुगरणचे मालक वाघमोडे व चालक वाघचवरे ठार ; आयशर आणि ओमनी कारचा भीषण अपघात, झाला सोलापूर :...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2025
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Jul    

Our Visitor

1837770
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group