सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित शहरातील प्रभाग जनसंवाद यात्रा आज चौथ्या दिवशी दहिटणे (प्रभाग २) येथे गणेश मंदिरासमोर खुल्या जागेत मोठ्या जल्लोषात संपन्न झाली.
सुरुवातीला श्री गणेश मंदिरातील गणपतीची आरती व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदना करण्यात आली.
जनसंवाद यात्रेचे आयोजन उत्तर विधानसभा अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी व त्यांच्या प्रभागातील पदाधिकारी सहकाऱ्यांनी यात्रेला उपस्थित पक्षातील नेते मुख्य पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यानंतर त्या भागातील नागरिक मुस्ताक पटेल, सूर्यकांत जतकर, डॉक्टर शेख, गव्हाणे तानाजी यांनी आपल्या मनोगतात त्या भागातील जनतेच्या समस्या मांडताना गेल्या ५ वर्षापासून कशा प्रकारे महापालिकेतील सत्ताधारी फसव्या भाजपाने व सध्याचे उत्तर विधानसभाचे आमदार यांनी जनतेला विकासाचे गाजर दाखवून फसविले, भागातील कोणतेही कामे समाधानकारक पूर्ण न करता एके काळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या प्रभागात लोकांना भूलथापांना बळी पाडून कोणताही विकास न करता यांना बेहाल केले त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत या भागातील नागरिक जास्तीत जास्त संख्येने नगरसेवक राष्ट्रवादीचे तसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करणार असून त्यातीलच एक भाग म्हणून डॉक्टर शेख यांनी स्वतःचे क्लीनिक लसीकरणासाठी देणार असल्याचे सांगितले.
युवा पदाधिकारी म्हणून प्रभाग अध्यक्ष सागर गव्हाणे याने पक्षाकडून देण्यात येणारी सर्व प्रकारची जबाबदारी पार पाडणार असल्याचे सांगत उपस्थित समस्त युवावर्ग आता राष्ट्रवादी प्रेरित झाल्याचे सांगितले.
युवक विधानसभा अध्यक्ष अक्षय कोरडे – युवक विद्यार्थी चे कोरोना मध्ये बेहाल असताना इथले आमदार, नगरसेवक मदतीला आले नाहीत त्यामुळे जनतेच्या मदतीला धावून न येणारे जातीयवादी पक्षाचे नगरसेवक आणि आमदार यांना येणाऱ्या मनपा निवडणुकीत हद्दपार करा आणि करुणा काळात गरिबांच्या मदतीला धावून जाणार्या युवा मार्गदर्शक संतोषभाऊ पवार यांनी राबविलेल्या वेगवेगळ्या रुग्णालय मदत आणि माहिती उपक्रमांच्या आधारे अत्यंत मोलाची मदत कशाप्रकारे झाली हे सांगताना त्यांच्या पाठीशी आपण हक्काने उभे राहिले पाहिजे.
महिला शहराध्यक्ष व नगरसेविका सुनिता रोटे यांनी सुंदर आयोजन बद्दल प्रभाग पदाधिकारी यांचे विशेष कौतुक केले आणि जास्तीत महिला यापुढे राष्ट्रवादी मध्ये या भागातून समाविष्ट होतील यासाठी महिला आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
नगरसेवक तौफिक शेख यांनी जनतेच्या सर्व धर्माच्या स्मशान भूमी मध्ये जास्तीत जास्त सुधारणा करण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार असल्याचे सांगत राष्ट्रवादी ध्येयाने सर्वजण समर्पक भावनेने एकत्र काम करणार असल्याचे व प्रभागातून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येऊन “इन्शाल्ला, जानेवाली इलेक्शन के बाद महापालिका मे राष्ट्रवादी का महापौर बनेगा” असे ठणकावून सांगितले.
युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान – प्रभागातील संपूर्ण युवकांची फळी खांद्याला खांदा लावून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त युवा नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी राष्ट्रवादी चे कार्य जनमाणसापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच निवडणुकीच्या वेळी बूथ साठी सक्षम यंत्रणा राबवण्यात येणार असल्याचे सांगितले.
यानंतर कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी या पुढील काळात उत्तर विधानसभा व प्रभागातील युवा तसेच महिला वर्गाकडे विशेष जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे सांगत दहिटणे भागात अपुर्या राहिलेल्या कामासंदर्भात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे यशस्वी पाठपुरावा करून जनतेला खऱ्या अर्थाने अच्छे दिन देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जाणार असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना भारत जाधव यांनी सांगितले की राष्ट्रवादी परिवाराचा एक प्रमुख या नात्याने समस्त जेष्ठ नेते पदाधिकारी यांच्या अनुभवाचा फायदा भागातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी युवा विद्यार्थी युवती महिला यांना सोबत घेऊन घराघरात राष्ट्रवादीचे विचार घराघरात पोहोचविण्यात येतील आणि देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विशेष लक्ष असलेल्या सोलापूर महानगरपालिका मध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीची सत्ता आणणार असल्याचे सांगितले.
आजच्या जनसंवाद यात्रेला मार्गदर्शन करत मनोगत व्यक्त केलेल्या मान्यवर यांचेसह शहर नेते पद्माकर नाना काळे व पदाधिकारी मिलिंद गोरे, रुपेश भोसले, सरफराज शेख, सोमनाथ शिंदे, अमीर शेख, संजय जाबा, साबीर इनामदार, ज्योतिबा गुंड, शिवराज विभुते हे
तर प्रभागातील सागर गव्हाणे (अध्यक्ष), आफ्रीन पटेल, अक्षय कोरडे, आशिष जेटीथोर, अय्युब पठाण, यतीराज गायकवाड, प्रसाद कलशेट्टी, स्वप्निल काळे, सद्दाम हिरोली, नागेश गुजराती, सागर पोळ, मौलाली शेख, हयाबी पटेल, अश्विन सरवदे, रेखा माडीकर, बबीता यादव, निलेश सरवदे, विजय माने हे तसेच भागातील प्रतिष्ठित नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश निंबाळकर तर प्रास्ताविक प्रकाश जाधव यांनी केले.
जनसंवाद यात्रा उद्या 9 सप्टेंबर रोजी प्रभाग १३, भगवान नगर येथे (अचिव्हर्स हॉल शेजारी) आयोजित करण्यात आल्याचे कार्याध्यक्ष संतोषभाऊ पवार यांनी सांगितले.




















