कोरोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचा सिविल हॉस्पिटल मध्ये ऑक्सीजन प्लांटचे उद्घाटन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोच्या दुसऱ्याला लाटेत प्रशासनाला झालेला त्रास, ऑक्सिजनची कमतरता त्यानंतरची परिस्थिती आता या प्लांटमुळे उपलब्ध होणारे ऑक्सिजन यामुळे पालकमंत्री दत्तामामा भरणे हे अतिशय आनंदी दिसले, भाषणात त्यांनी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन, सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन, आरोग्य यंत्रणेचे विशेष शब्दात आभार मानले.
मात्र आम्ही दोन्ही लाटेत एवढे चांगले काम केले. 98 टक्के काम आमचे जिल्ह्यात चांगले होते, मात्र काहीशा चुका होतात, 2 टक्के चूका झाल्या तर किती वाजवायचे राव असे वारंवार ते समोर बसलेले पत्रकार व आमदार प्रणिती ताईंकडे पाहत बोलत होते प्रणिती शिंदे यांना काय समजायचे ते समजले. मात्र या भाषणातून त्यांचा रुख पत्रकारांवर होता तो म्हणजे, इंदापूर तालुक्याला उजनीचे पाणी न मिळाल्याची खदखद त्यांनी नकळत व्यक्त केली, पहा त्यांचा हा व्हिडीओ


















