सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे नवे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे रविवारी प्रथमच सोलापूर दौऱ्यावर आले होते. शासकीय विश्रामगृहावर शाई फेकीचा राडा झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर ते बालाजी सरोवर या ठिकाणी गेले तिथे एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्याच रस्त्यावर असलेल्या माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी ते रात्रीच्या भोजनाला गेले.
या ठिकाणी देशमुख परिवारांच्या वतीने नामदार चंद्रकांत दादा यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी हॉलमध्ये कार्यकर्त्यांची ओळख परेड सुरू होती. प्रत्येक जणांनी आपली ओळख करून दिली. याच वेळेस एका सोप्यावर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी बसले होते जेव्हा सचिनदादा हात जोडून आपली ओळख देण्यासाठी उठताच चंद्रकांत दादांनी “अरे राहू द्या” असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पहा तू मजेदार किस्सा काय होता हा व्हिडिओ..