जुळे सोलापूरला जोडणारा रेल्वे पूल कमकुवत झाला होता व ह्याच पूलावरून जड वाहतूक व ऊस वाहतूक करणारे जड वाहने ये जा करीत असल्यामुळे या रेल्वे पूलावर ठीक ठिकाणी खड्डे पडून अपघात घडत होते. व लोक पडून जखमी होत होते. त्यामुळे आसरा ब्रिज धोकादायक बनला होता व रुंदीकरण करून चौपदरी रस्ता करण्याबाबत जुळे सोलापूरकरांची मागणी सातत्याने होत होती.
माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी आसरा ब्रिजवर पडलेले मोठे खड्डे बुजवून घेऊन डांबरीकरण करणे बाबत सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन दिले होते, दरम्यान रातोरात आसरा चौक ते दत्त मंदिरपर्यंत रस्ता करण्यात आला.
आसरा रेल्वे ब्रिज विभाग 25 व प्रभाग 26 मधून जात असल्यामुळे त्या भागातील राहणारे नागरिक यांनी ही बाब नगरसेविका राजश्री चव्हाण, व माजी नगरसेविका मनीषा हुच्चे यांना सांगितले होती. बाब गंभीर असल्यामुळे सदर आसरा रेल्वे ब्रिजसाठी रुंदीकरण करून चौपदरी करणेबाबत प्रथम त्या मतदारसंघातील आमदार सुभाष देशमुख व खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांना निवेदन दिले होते. याची दखल घेत आमदार देशमुख व खासदार महास्वामी यांनी केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता.
केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी ऑनलाइन उद्घाटन करून आसरा ब्रिज कामाचे लोकाप्रर्ण केल्याने जुळे सोलापुराकरांचा जटील प्रश्न मार्गी लागला आहे. आमदार सुभाष देशमुख, खासदार जयसिद्धेश्वर महाराज ह्या आसरा ब्रिजसाठी सतत पाठपुरावा करणाऱ्या माजी नगरसेविका चव्हाण व मनीषा हुच्चे, तसेच संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम यांचे मनापासून जुळे सोलापुरातील नागरिक आभार मानले आहेत.


















