सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते त्यांनी जिल्हा नियोजन भावनाथ यांच्या आढावा बैठका होत्या दुपारी त्यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी उपस्थित नागरिकांची निवेदने स्वीकारली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लता ढेरे यांच्या सोबत आसरा सोसायटी परिसरातील महिलांनी एकत्र येऊन पालकमंत्री भरणे मामा यांना निवेदन दिले आणि आपल्या भागामध्ये रस्त्याची अडचण सांगितली,
नगरसेवक लक्ष देत नाही या भागातले भाजपचे आमदार सुभाष देशमुख हे हे सुद्धा रस्ता करत नाहीत मग आम्ही जायचे कुठे? अशा तक्रारी महिलांनी मांडल्या. तेव्हा पालकमंत्री भरणे यांनी हा विषय माझा येत नाही, महापालिकेच्या सभेत प्रथम ठराव होऊ द्या नंतर बघू असे म्हणून त्या महिलांना प्रतिसाद दिला नाही यामुळे महिला नाराज होऊन परतल्या.
याबाबत अधिक माहिती घेतली असता नगरसेवक तोफिक शेख यांनी सांगितले की, आसरा सोसायटीतील रस्त्याचा विषय असून त्याबाबत राष्ट्रवादीचे इरफान शेख हे पाठपुरावा करत आहेत मात्र निधी नसल्याने रस्ता होऊ शकत नाही म्हणून पालकमंत्र्यांकडे निधी देण्याची मागणी इरफान शेख यांनी केल्याचे ते म्हणाले.
















