सोलापुर महानगरपालिका नगररचना विभागामार्फेत शहरातील जवळ जवळ ३०० ते ४०० जागाधारकांना नाल्यावरील बांधकाम अनाधिकृत असल्याचे कारण देत नोटीसा बजावल्या आहेत.
प्रभाग २० मधील भिमाशंकर नगर मधील ७० ते ८० जागाधारकांना नोटीसा दिल्या असल्याची तक्रार तेथील स्थानिक नागरिकांनी सभापती अनुराधा काटकर यांच्याकडे केली होती, सभापती काटकर यांनी आयुक्तांना व महापौर यांना ही बाब निदर्शनास आणून दिली, व नोटीसा चुकीच्या पध्दतीने दिल्याचे सांगितले.
हा परिसर हा ग्रांमपंचायत हद्दीतील असताना तेथील बांधकाम झालेली असुन ७ ते ८ वर्षापुर्वी हा परिसर महानगरपालिकेमध्ये हद्दवाढ भाग म्हणुन समाविष्ट केल्याचे निदर्शनास आणुन देताच आयुक्त पी.शिवशंकर यांनी जागेवर पाहाणी करून कारवाई करणार असल्याचे आश्वान दिले .सभापती काटकर यांनी दंड आकारून बांधकाम परवाना पुर्ववत करून दया अशी मागणी करत शुक्रवारी होणार्या सर्वसाधारण सभेत हा विषय लक्षवेधी म्हणून घेणार असल्याचे सांगितले आहे.


















