सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची मसुरी येथे प्रशिक्षण होऊन अनेक दिवस झाले ते पुढील पोस्टिंगच्या प्रतीक्षेत आहेत. यापुढे पोस्टिंग ही त्यांना जिल्हाधिकारी पदावर मिळेल अशी चर्चा आहे. त्याचबरोबर सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी क्रमांक दोन मनीषा आव्हाळे यांना सोलापूर जिल्ह्यात जवळपास दोन वर्षे पूर्ण होत आहेत त्या सुद्धा पुढील पोस्टिंगच्या प्रतीक्षेत आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेत येऊन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना साधारण अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. या अडीच वर्षांमध्ये त्यांनी विविध उपक्रम आणि संकल्पना राबवल्या त्यापैकी अनेक उपक्रम हे राज्य शासनाने स्वीकारले आहेत. म्हणून त्यांची नवनवीन संकल्पनेचा शिल्पकार म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
सहसा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम केल्यानंतर पुढील पोस्टिंग ही जिल्हाधिकारी म्हणून मिळते. दिलीप स्वामी यांना लवकरच जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती होणारे असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे. ते सुद्धा बऱ्याच दिवसापासून पोस्टिंग च्या प्रतीक्षेत आहेत. येत्या 27 जून रोजी पंढरपूरची आषाढी वारी येत असल्याने या आषाढी वारी नंतरच त्यांची बदली होईल अशी शक्यता असून निश्चितच त्यांना पांडुरंग पावेल अशी मजेशीर चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
थेट आयएएस असणाऱ्या सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे या जुलै 2021 मध्ये सोलापूर जिल्ह्यात परिविक्षाधीन अधिकारी म्हणून आदिवासी विकास विभागात त्या आल्या. त्या आल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मॅडम तुम्ही सोलापूरला कायम आठवणीत ठेवलं असे म्हणून स्वागत केलें होतें.तसे पाहिले तर अशा थेट अधिकाऱ्यांची पोस्टिंग वर्ष ते दीड वर्षानंतर अपेक्षित असते परंतु त्यांना जवळपास दोन वर्षे झाली आहेत अजूनही त्यांना पोस्टिंग नाही, त्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी इच्छूक आहेत. कारकुनी काम किती दिवस करायचे अशा वैतागलेल्या भूमिकेत त्या आहेत.



















