सोलापूर : राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर होते, त्यांनी सकाळी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार घेतली. यावेळी शहराध्यक्ष विक्रम देशमुख उपस्थित होते. यावेळी त्यांनी निवेदन करताना सांगितले की, सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी 500 एकर वन विभागाच्या जमिनीवर वन उद्यान उभे करण्याची मागणी केली असून त्या मागणीला मी आजच मंजूरी देतो, या वन उद्यानामुळे सोलापूरच्या वैभवात भर पडेल, त्याठिकाणी कोणत्या सुविधा किंवा सुधारणा करायच्या आहेत याबद्दल नागरिकांना सूचना करायच्या आहेत त्यांनी सुभाष देशमुख यांचे कार्यालय अथवा वन विभागाच्या कार्यालयात आणून द्याव्यात असे आवाहन त्यांनी केले. काय म्हणाले, मंत्री मुनगंटीवार पहा…..


















