सोलापूर : करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना पत्र देऊन शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये प्रकल्पग्रस्ताची रिक्त पदे भरावी अशी मागणी केली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेकडून भविष्यात होणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्तासाठी ५ टक्के समांतर आरक्षणाची रिक्त पदे भरणेसाठी जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त उमेदवाराची वारंवार मागणी होत आहे. जेणे करून प्रकल्पग्रस्तांना व त्यांच्या कुटुंबांना नोकरी मिळून त्यांच्या कुटुंबांना स्थैर्य मिळेल. तरी आगामी शिक्षक भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्तांच्या मागणीचा विचार करून ५ टक्के समांतर आरक्षणार्गत रिक्त पदे भरणेत यावीत. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये 2002 साली शेवटची प्रकल्पग्रस्तांची भरती दाखवण्यात आली आहे. त्यानंतर एक ही प्रकल्पग्रस्ताची जागा भरण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे.