करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांना कोरोनाची लागण झाली असून ते पुण्यामध्ये उपचार घेत आहेत
आमदार संजय मामा शिंदे यांनी स्वतःहून आपली कोरोना चाचणी पॉझिटिव आल्याची माहिती दिली आहे तसेच त्यांचे पीए प्रवीण शिंदे हे सुद्धा कोरोना पॉझिटिव झाले आहेत दोघांचीही प्रकृती उत्तम असून पुण्या मध्ये ते उपचार घेत आहेत आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी ,मास्क वापरावा, गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन आमदार संजय शिंदे यांनी केले आहे . पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ संजय मामा यांनी मोठी जबाबदारी स्वीकारली होती प्रचाराची सर्व सूत्रे त्यांच्याकडे होती भगीरथ यांच्यासाठी संजय मामा हे सर्व नेत्यांसोबत पंढरपूर मंगळवेढ्यात तळ ठोकून होते राष्ट्रवादी काँग्रेस च्या सर्व नेत्यांच्या प्रचार सभा या मोठ्या झाल्या, मोठी गर्दी या सभांना होती स्टेजवर शेकडो कार्यकर्ते एकत्र बसत होते 17 एप्रिल रोजी या मतदार संघासाठी निवडणूक झाली त्यानंतर दोनच दिवसांनी आमदार संजय शिंदे यांनी कोरुना चाचणी करून घेतली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे त्यांच्या संपर्कात अनेक जण आले आहेत त्यामुळे सर्वांनी अशा परिस्थितीत काळजी घेणे महत्त्वाचे आहे .लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करून घ्यावी आणि सुरक्षित व्हावे असे आवाहन आमदार संजय मामा शिंदे यांनी केले आहे .


















