सोलापूर : करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी जिल्हा नियोजन समिती सभेच्या दिवशी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे मागणी केली होती. कोरोना संसर्ग बऱ्यापैकी कमी होत असल्याने राज्य अनलॉक होत आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील आठवडी बाजार सुरू करण्यास काही हरकत नाही. या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश काढले.
त्याअर्थी, मी मिलिंद शंभरकर, जिल्हादंडाधिकारी, सोलापूर, तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूर मला आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सोलापूर जिल्हयातील (पोलीस आयुक्तालय सोलापूर ची हद्द वगळून) दि. २८.१०.२०२१ पासून सर्व प्रकारचे आठवडा बाजार, जनावरांचा बाजार भरण्यास परवानगी देत आहे.
सदर आठवडा बाजार मध्ये कोव्हिड १९ च्या अनुषंगाने राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन होते अगर कसे याबाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशासन यांनी नियंत्रण ठेवावे. तसेच सदर आठवडा बाजार यांना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशासन यांनी घालून दिलेल्या अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहील.
सुरू करणेत येणा-या आठवडे यानाराशी संबंधित असणा-या आस्थापनांनी आठवडे बाजार भरणा या ठिकाणी मास्कचा वापर, सोशल डिस्टटन्स, सॅनिटायझेशन याबाबतच्या नियमांचे तसेच शासनाने व या कार्यालयाने कोविड-२९ संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होते आहे अगर कसे याबाबत नियंत्रण स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशासन यांनी ठेवावे. त्यानुसार सदरचे आठवडा बाजार स्थानिक स्वराज्य संस्था यांनी ठरवून दिलेल्या नियमानुसार सुरु राहणेस परवानगी असेल.



















