कोरोना महामारी फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील विविध शासकीय कर्मचाऱ्यांना आमदार रोहित पवार यांच्या वतीने सोलापूर शहरातील महापालिका जिल्हा परिषद जिल्हा प्रशासन पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक सिविल हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्स यांना 11000 ओआरएस एनर्जी ड्रिंक भेट देण्यात आले, जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी ओआरएस स्वीकारले, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवकाध्यक्ष गणेश पाटील ,जिल्हा परिषद सदस्य अतुल खरात, बारामती ऍग्रो चे दत्तात्रय सावंत, आप्पासाहेब केचे, प्रदेश युवक सचिव प्रशांत बाबर, महेश कुलकर्णी, अमोल सुरवसे, यांची उपस्थिती होती.या उपक्रमाचे आरडीसी भारत वाघमारे यांनी कौतूक केले….