26 जानेवारी 2021 रोजी सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड, MIDC येथे म.न.पा.च्या नवीन पाण्याचा टाकीजवळ, सोलापूर येथे आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून नवीन अग्निशामक केंद्राची उभारणी करण्यात आले व त्याचे उद्घघाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी खासदार धर्मण्णा सादुल, यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, सोलापूर MIDC असोसिएशनचे अध्यक्ष तिलोकचंद कासवा, सोलापूर रेडिमेड असोसिएशनचे राजू कोचर, जितेंद्र ढाकलिया, अग्निशामक केंद्राचे अधिक्षक केदार आवटे आदि. मान्यवर उपस्थित होते.
सोलापूर अक्कलकोट रोड MIDC येथील अग्निशामक केंद्र म.न.पा. च्या नविन पाणी टाकीजवळ अग्निशामक केंद्रची उभारणी करण्याची अत्यंत आवश्यकता होती. गेल्या सहा ते सात महिन्यापूर्वी अक्कलकोट रोड MIDC मधील यंत्रमाग कारखान्यात आग लागून पक्का माल जळून अतोनात हानी झाली होते. त्याचप्रमाणे MIDC मध्ये असलेल्या परिसरातील अनेक कारखान्यांना आग लागुन नुकसान झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. यासाठी अक्कलकोट रोड MIDC येथील सोलापूर यंत्रमाग असोसिएशन लगत असलेल्या महापालिकेच्या नविन पाणी टाकीजवळ नविन अग्निशामक केंद्र (फायर स्टेशन) उभारणी केल्यास येथील सर्व उद्योजकांना वेळेवर अग्निशामक केंद्राकडून तातडीने मदत मिळू शकेल व आगीमुळे होणारी हानीसुध्दा टाळता येईल. त्यामुळे सदर ठिकाणी अग्निशामक केंद्राची उभारणी करण्यात यावी याबाबत सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघटनने आमदार प्रणिती शिंदे यांना मागणी केली होती.