काँग्रेस पक्षाचे माजी शहर अध्यक्ष सुधीर खरटमल माजी महापौर नलिनी चंदेले यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याचबरोबर माजी महापौर बेरिया यांनी सुद्धा पवार यांची भेट घेतली आहे.
या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची सोमवारी प्रतिक्रिया घेतली असता सुधीर खरटमल नावाला एवढे महत्त्व का? ते आमच्या पक्षात कुठे आहेत, नलिनी चंदेले सुद्धा आमच्या पक्षात नाहीत त्या काँग्रेस भवनमध्ये स्वतःहून येतात आम्ही का जा म्हणायचे, आगामी महापालिका निवडणुकीत महेश कोठे विरोधक नसणार भाजपच विरोधक असे सांगत त्यांनी शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा मी आदर करते असे म्हणून बोलणे टाळले पहा काय म्हणाल्या प्रणिती शिंदे हा व्हिडीओ


















