उत्तराखंड मधील ऋषिकेश येथील परमार्थ निकेतन आश्रम येथे हिंदु धर्मात पवित्र स्थान असलेल्या गंगा मातेची आरती आमदार प्रणिती शिंदे यांनी करून सर्वांच्या आयुष्यात आनंद, समाधान, सुख ,समृद्धि ,धन ,ऐश्वर्य, शांती लाभो अशी प्रार्थना केली.
यावेळी परमार्थ निकेतन ऋषिकेश आश्रमाचे अध्यक्ष स्वामी चिदानंद सरस्वती यांनी आशीर्वाद दिला.
तसेच यावेळी खास करून परमार्थ निकेतन आश्रमाचे अध्यक्ष स्वामी चिदानंद सरस्वती यांनी गंगा नदी सतत प्रवाहित राहण्यासाठी तत्कालीन केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बैठक घेऊन प्रयत्न केले. रात्री एक वाजेपर्यंत ती बैठक चालली होती. याची आठवण ही सांगितली.



















