“आजपर्यंत आपण शहर उत्तर कडे नजर अंदाज केलो, काँग्रेसची हवा काय आहे हे शहर उत्तरला माहिती नाही, एकदा घुसलो तर पिंजून काढल्याशिवाय राहणार नाही, भाजप असेल किंवा इतर कोणते पक्ष असतील आपण लक्ष दिले नाही, पण आता उत्तरमध्ये घुसणार”
काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या संकल्पनेतून काँग्रेस मनामनात,काँग्रेस घराघरात या उपक्रमाचा शुभारंभ शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या घरातून झाला. त्यांचे चिरंजीव प्रवीण वाले यांच्या संपर्क कार्यालयाचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला. यावेळी उत्तर कसबा हा विभाग भारतीय जनता पार्टीचा सध्या बालेकिल्ला समजला जातो मात्र या ठिकाणी उपस्थित असलेला प्रचंड युवा वर्ग पाहता प्रणिती शिंदे या आपल्या भाषणात भारतीय जनता पार्टीवर अक्षरशा तुटून पडल्या,
भाजप कायमच सुशीलकुमार शिंदे साहेबांवर टिका करत आलय, शिंदे यांनी काय केले केवळ उजनीचे पाणी आणले, काय उजनी उनजी करताय,तुम्हाला काय पाण्याचं महत्व माहीत, आम्ही येणारे 100 वर्ष उजनीचे नाव घेणार, उजनीचेच पाणी पिणार, आहे का तुमच्या किंमत दुसरी पाइपलाइन आणण्याची, किती वेळा आम्ही दुहेरी पाईपलाईनचे नाव ऐकतो, यांचे दोन मंत्री एक खासदार होता आणली का त्यांनी पाईप लाईन मी आज चॅलेंज करते, केंद्रात तुमची सत्ता आहे मोदीबाबा पंतप्रधान आहेत अजूनही आणून दाखवा दुहेरी पाईपलाईन आहे का हिम्मत.
आता तर दुष्काळात तेरावा महिना कोरोना आला लॉकडाऊन झालं, दुसऱ्या देशात जाऊन बघा, काय केलं त्यांनी हॉस्पिटल वाढवले, व्हेंटिलेटर वाढवले, आईसीयू बेड वाढवले, ऑक्सिजन वाढवले मात्र काय केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाताची घडी तोंडावर बोट. एकदाही पत्रकारांसमोर आले नाही, मागच्या वर्षी जर भाजप सरकारने हॉस्पिटल, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन दिल असतं तर आज एवढी लोकं मेली नसती या सर्व लोकांच्या मृत्यूस कारणीभूत केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत असा थेट आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला.
भाजपने पाणी घराघरात आणण्याऐवजी, महागाई घराघरात आणली, भाजपने शहर उत्तर वर अन्याय झालाय, जात पातीच्या नावाखाली राजकारण केले, कोणतीही सेवा मिळाली नाही, स्मार्ट सिटीच्या नावाखाली केवळ भ्रष्टाचार झाला, केवळ तीन टक्केच भागात स्मार्ट सिटीची कामे का?, आता वायफायने लोकांची पोट भरणार आहे, हातावर पोट असणारे शहर उत्तरमध्ये लाखो लोक आहेत, केवळ टक्केवारी खाणारे, कॉन्टॅक्टर यांचेच पोट भरले असा थेट आरोप आमदार विजयकुमार देशमुख यांचे नाव न घेता आमदार प्रणिती शिंदे यांनी केला.


















