सोलापूर ! शेळगी, बाळे,देगांव गावठाण सह हद्दवाढ भागातील प्लॉट धारकांना पुढील आठवड्यापासून शेळगी सात बारा उतारा उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली.
1992 मध्ये शहराच्या लगत असणाऱ्या काही गावठाण भागांचा आणि नगरांचा शहरांमध्ये समाविष्ट करून घेण्यात आला होता. शहरी भागामध्ये समाविष्ट झाल्यामुळे या भागात नागरी वसाहतीच्या संख्यात वाढ झाली होती,पण प्लाॅटधारकांना घेतलेल्या जागेचे प्रॉपर्टी कार्डही मिळत नव्हते आणि सात बारा उतारा ही यामुळे प्लॉट धारकांना आपला प्लाॅट हस्तांतरित करणे,उताऱ्यावर वारसदारांची नोंद करणे अथवा कर्ज काढण्याकरिता प्लॉटधारकास अडचण येत होती. वारंवार मागणी करून देखील जिल्हा प्रशासनाकडून हद्दवाढ भागातील गावठाण प्लॉट धारकांना सात बारा किंवा प्रॉपर्टी कार्ड मिळत नव्हता म्हणून मंगळवारी आमदार विजयकुमार देशमुख यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमवेत घेतली या बैठकीस नगरसेवक डाॅ किरण देशमुख, वीरेश उबंरजे, जयवंत सलगर, रवी मेणसे, यांच्यासह महसुल प्रशासनातील अधिकारी भूमापन अधिकारी सिटी सर्वे अधिकारी उपस्थित होते या बैठकीत ,बाळे,दहिटणे, देगांव आदी गावठाण भागातील प्लॉट धारकांना प्रॉपर्टी कार्ड व सात बारा मिळवण्यासाठी निर्माण होत असलेल्या अडचणीवर चर्चा करण्यात आली. सिटी सर्वे शेळगी बाळे देगाव विभागातील प्रॉपर्टी धारकांना सातबारे उतारे न देण्याचा चुकीचा निर्णय झाल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या लक्षात येताच त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना फैलावर घेत नागरिकांना वेठीस धरू नका, सातबारे उतारे व प्रॉपर्टी कार्ड मिळत नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत, सिटी सर्वे पूर्ण होईल तोपर्यंत सर्व मिळकत दारांना तात्काळ सातबारे उतारे देण्याची सोय करा अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या बैठकीत घेतलेल्या निर्णयात आमदार विजयकुमार देशमुख यांनी वर्षानुवर्षांचा बाळे देगाव आदी भागातील प्रॉपर्टी धारकांचा प्रश्न निकाली काढल्याबद्दल जिल्हाधिकारी यांचे आभार मानले.
सातबारे उतारे प्रॉपर्टी धारकांना मिळत नसल्यामुळे वारस नोंद खरेदी खत नोंद मिळकतीची खरेदी-विक्री व बँक लोन करताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता अशा अनेक तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने तात्काळ जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी संपर्क साधून हा विषय निकाली काढण्यासाठी ंबंधित अधिकार्यांसमवेत तात्काळ बैठक लावण्याची विनंती जिल्हाधिकारी शंभरकर यांना केली होती.
त्या अनुषंगाने आज बैठकीत सविस्तर चर्चा झाली व जिल्हाधिकारी यांनी येत्या आठ दिवसात शेळगी दहिटणे बाळे देगाव मधील प्रॉपर्टी धारकांना तात्काळ सातबारे उतारे देण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर येत्या दोन ते तीन वर्षात सिटीसर्वे चा सर्वे देखील पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या त्याचबरोबर शेळगी येथील तलाठी कार्यालय सुरू करून त्या कार्यालयातून मेकअप दारांना सातबारे उतारे वारस नोंद खरेदीखत नोंद करण्याच्या सूचना तलाठ्यांना देण्यात याव्यात असे आदेश जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आमदार देशमुख यांनी सांगितलं.
या निर्णयामुळे शेळगी दहिटणे बाळे देगाव येथील प्रॉपर्टी धारकांना याचा लाभ होणार आहे पुढील आठवडय़ापासून हद्दवाढ भागातील प्लॉटधारकास संबधीत भागातील तलाठी कार्यालयात सात बारा उतारा उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली




















