सोलापूर : विकासामध्ये जितकी आमदारांची भूमिका महत्त्वाची आहे महत्त्वाची भूमिका त्यांच्या स्वीय सहाय्यक अर्थात पीए यांची पाहायला मिळते. आमदार हे महिन्यातून अनेक दिवस मुंबईकडे असतात परंतु त्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांचा पीए जिल्ह्यात कामकाज बघतो.
याच विकासाच्या दृष्टीने सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आमदारांच्या पीए सुद्धा तितकेच महत्त्व देत त्यांच्यासाठी वेळ देत बैठक ठेवली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाचे सर्वच आमदारांच्या पीए कडून स्वागत केले जात आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या कामांचा पाठपुरावा हा आमदारांचे पीए करतात. नियोजन समितीतून शेकडो कोटीचा निधी वितरित केला जातो. कामांची यादी तयार झाल्यानंतर नियोजन समिती मधून मंजुरी दिले जाते. हे सर्व लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोमवारी जिल्ह्यातील सर्वच आमदारांच्या स्वीय सहाय्यकांची बैठक बोलावली आहे.
विशेष म्हणजे या बैठकीला सर्व उपजिल्हाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे समजले. सोलापूर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद असल्याचे सांगण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यात विधानसभेचे 11 आमदार आहेत त्यानंतर विधान परिषदेचे दोन आमदार असे तेरा आमदार जिल्ह्याचा कारभार पाहतात. प्रत्येक आमदाराकडे किमान दोन ते तीन पीए संख्या आहे. निश्चितच या बैठकीनंतर अनेक विषय मार्गी लागतील आणि विकासाला चालना मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.