“माझे गाव कोरोनामुक्त गाव…, माझे दुकान, माझी जबाबदारी…यानंतर आता माझे मुलं, माझी जबाबदारी….,त्याचबरोबर माझा विद्यार्थी माझी जबाबदारी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांची संकल्पना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रत्यक्षात आणली. त्यांची ही संकल्पना आता राज्यभर राबवली जाणार आहे आणि सोलापूर जिल्हा हा माझे मुल, माझी जबाबदारी व माझा विद्यार्थी, माझी जबाबदारी हे दोन उपक्रम सुरू करणारा राज्यातील पहिलाच जिल्हा आहे”.
सोलापूर – कोरोनाच्या तिसरे लाटेचे पार्श्वभुमीवर सोलापूर जिल्हा परिषद राबवित असलेला “माझे मुल माझी जबाबदारी “ अभियान हा उपक्रम राज्यात पथदर्शक आहे. असे मत सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
होटगी येथे सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने “ माझे मुल माझी जबाबदारी” व “ माझा विद्यार्थी माझी जबाबदारी” या दोन अभियानाचा शुभारंभ सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते करणेत आला. या कार्यक्रमास आमदार सुभाष देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. प्रदीप ढेले, ढोले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. शीतलकुमार जाधव, जिल्हा शिक्षणाधिकारी संजय राठोड, जिल्हा लसीकरण अधिकारी डाॅ. पिंपळे, डाॅ. संतोष जोगदंड, गटविकास अधिकारी रंजना कांबळे, होटगीच्या सरपंच लक्ष्मीबाई गायकवाड, प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी “माझे मुल माझे अभियान “ चा शुभारंभ पालकमंत्री भरणे यांचे हस्ते करणेत आला.
माझे गाव कोरोना मुक्त गाव अभियानामुळे सोलापूर जिल्ह्याचे राज्यात नाव झाले असे सांगून पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या जनसंवाद कार्यक्रमाच्या सोलापूर जिल्ह्यातील या अभियानाचा उल्लेख करून त्या नुसार हे अभियान राज्यात राबविण्याची सुचना केली. त्याच धर्तीवर सोलापूर जिल्हा परिषदेने हे “माझे मुल माझी जबाबदारी” हे अभियान तिसरी लाट जेव्हा येईल तेंव्हा प्रभावी ठरणार आहे. दोन लाटेचा चांगला अनुभव असलेमुळे व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी चांगले काम केले आहे. अशा स्थितीत पालकांची जबाबदारी महत्वाची आहे. या अभियानात ९ लाख ७७ हजार बालक व विद्यार्थी यांची तपासणी केली जाऊन त्यांना आरोग्य कार्ड दिले जाणार आहे. होटगी साठी स्वतंत्र पोलिस स्टेशनसाठी प्रस्ताव मागवून घेत आहेत. तसेच व आशा वर्कर यांचे थकीत मानधनाचा प्रश्न सोडविणार आहे. तसेच बालकांच्या आरोग्य तपासणी साठी निधी देणार असल्याची ग्वाही पालक मंत्री भरणे यांनी दिली.
आशा वर्करचे कोरोना काळातील मानधन द्या – आमदार देशमुख
……………………………..
या प्रसंगी बोलताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले, कर्मचारी यांनी स्वत: चे आरोग्य धोक्यात घालून काम केले आहे. सर्व यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करीत आहे. माझे मुल माझे अभियान यासाठी सीएसआर मधून निधी देणेसाठी मी प्रयत्न करेन. आशा स्वयंसेविका यांचे कोरोना काळातील मानधन तात्काळ देणेत यावे. तसेच वळसंग पोलिस स्टेशन गैरसोयीचे त्यामुळे होटगी परिसरांत विविध उद्योग व संस्था व कारखाने आहेत. त्यामुळे होटगी साठी स्वातंत्र पोलिस ठाणे करणेची मागणी केली.
जिल्हयात ९ लाख ७७ बालकांची तपासणीसाठी अभियान – सिईओ दिलीप स्वामी
——————-
सोलापूर जिल्हयात माझे मुल माझी जबाबदारी या अभियानातून ९ लाख ७७ हजार बालकांची तपासणी केली जाणार आहे. कोरोनाची तिसरी लाट येणे पुर्वी हे नियोजन केले जाणार आहे. नामवंत बालरोग तज्ञ यांचेशी चर्चा करून हे नियोजन केले आहे. लहान मुले कोरोनाला बळी पडू नये यासाठी नियोजन करीत आहेत. ज्या मुलांना धोका अधिक आहे अशा मुलांचा सर्वेक्षण करून आरोग्य पत्रिका तयार केली जात आहे. अभियान स्वरूपात ही मोहिम राबविली जाणार आहे. आता पर्यंत विविध १६ अभियाने राबवून कोरोनाला अटकाव केला आहे. कोरोना होऊच नये साठी दक्षता घेतली जात आहे. असेही मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. विस्तार अधिकारी जयश्री सुतार व उप शिक्षिका दिपाली बोराळे यांनी सुत्रसंचालन केले.बाल विकास प्रकल्प अधिकारी ढाकणे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी ग्रामसेवक बी डी पाटील, विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, गट शिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, यांनी परिश्रम घेतले.