सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सध्या एक वाक्य प्रचलित झालं आहे ते म्हणजे “रात्रीस खेळ चाले”. राष्ट्रवादी काँग्रेसचे वेळापूर गटाचे सदस्य त्रिभुवन धाईंजे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे सदस्य आनंद तानवडे व बार्शीचे सदस्य मदन दराडे या दोघांची जिल्हा परिषदेमध्ये चालत असलेली लुडबुड पाहता हे दोघे रात्रीस खेळ चाले मधील कलाकार असल्याची खिल्ली उडवली होती. आता तर या दोघांना माळशिरस तालुक्यातील सदस्य अरुण तोडकर हे सुद्धा येऊन मिळाले आहेत त्यामुळे केवळ रात्रीस खेळ चालत नाही तर दिवसाही आणि सुट्टीत ही या तिघांचे खेळ जिल्हा परिषदेमध्ये चालतात. त्यामुळे अधिकारी वर्ग वैतागलेल्या अवस्थेत आहे. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि सदस्य आनंद तानवडे यांच्यात कायमच शाब्दिक वॉर होत आलेला आहे,जिल्हा परिषदेचा निधी वाटपावरून या दोघात खटके उडतात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जिल्हा परिषदेच्या निधी वाटपात लक्ष घालू नये अशी भूमिका तानवडे यांच्या असते हे दोन्ही जरी नेते एकाच पक्षाच्या असले तरी माध्यमांमधून कायम एकमेकाच्या विरोधात बातम्या लागतात. सध्या आनंद तानवडे यांच्या पोस्टर मधून भाजपचे कमळ गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळतंय यापूर्वी त्यांनी केलेले पोस्टर त्या प्रत्येकात भारतीय जनता पार्टीचे कमळ पाहायला मिळत होते मात्र आता ते कमळ गायब झाल्याचं चित्र आहे.
पूर्वीचे पोस्टर पहा
आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती शुभेच्छाचे पोस्टर पहा
माळशिरस तालुक्यात घड्याळ चिन्हावर निवडून आलेले अरुण तोडकर यांनी रणजितसिंह मोहिते-पाटील हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर आता ते सुद्धा आपल्या विविध पोस्टर मध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाचा वापर करताहेत परंतु आता त्यांच्याही पोस्टरवरून कमळ गायब झाल्याचं पाहायला मिळत.
पूर्वीचे त्यांचे पोस्टर पहा
आणि आता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी शुभेच्छा पोस्टर पहा
एकूणच जर हे सर्व चित्र पाहिलं तर आनंद तानवडे आणि अरुण तोडकर यांनी भारतीय जनता पार्टी सोडण्याचा विचार तर केला नाही ना असा प्रश्न जिल्हा परिषदेमध्ये उपस्थित केला जातोय.

























