सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांनी स्थापित केलेल्या बुधवार पेठ परिसरातील अष्टविनायक गणपती पैकी पाचवे गणपती वीरकर गणपती व 68 लिंगापैकी 31 पशुपती लिंग हनुमान मंदिर या मंदिराच्या 12 जानेवारी सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी जीर्णद्धार लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.
त्यानिमित्ताने मंगळवार 10 जानेवारी सकाळी नऊ वाजता माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या समवेत सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाच्या अनुषंगाने या विभागाची पाहणी करण्यात आली. चंदनशिवे यांनी याबाबत अधिक माहिती दिली.


















