सोलापूरात आदिवासी विकास विभागाचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय हे यापूर्वी कुठे होते याची कुणालाही माहिती नव्हती, हे कार्यालय कुमठा नाका परिसरातील एका कॉलनीमधील इमारतीमध्ये होते, लाभार्थ्यांना त्या कार्यालयाला जायचे झाल्यास अडचणी येत होत्या, त्याठिकाणी काय चालत होत हे सुद्धा समजत नव्हते,
दरम्यान आयएएस अधिकारी मनीषा आव्हाळे यांची एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून सोलापूरला नियुक्ती झाली. या कार्यालयात सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याचे काम चालते. आव्हाळे या सोलापूरात आल्या आपले कार्यालय पाहण्यासाठी गेल्या असता तेव्हा ती जागा सोयीस्कर नव्हती, त्या इमारतीचे भाडे ही अवाढव्य होते, अशातच त्यांच्याकडे उपविभागीय अधिकारी क्रमांक 2 चा अतिरिक्त पदभार आला.
दक्षिण सोलापूर तहसीलदार कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर असलेले जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालय रिकामे होते त्यानंतर त्या कार्यालयाचा वापर दक्षिण तहसील कार्यालय करत होते, मनीषा आव्हाळे या दक्षिण व अक्कलकोट तालुक्याच्या प्रांत अधिकारी असल्याने त्यांनी हे कार्यालय आपल्या अधिकारात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय साठी घेतले. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून सध्या इथं प्रशस्त असे कार्यालय सुरू असून एका महिला अधिकाऱ्यामुळे या आदिवासी कार्यालयाला घरपणं आल्याचं चित्र आहे. शहराच्या एका कोपऱ्यात असलेले कार्यालय आता सर्व प्रशासकीय कार्यालय असलेल्या परिसरात आल्याने आदिवासी समाजातील लाभार्थ्यांची सोय होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात आदिवासी पारधी समाजासह कोल्हाटी समाज ही काही प्रमाणात आहे तसेच महादेव कोळी समाज असला तरी दाखल्या अभावी त्यांना आदिवासी विकास विभागाच्या योजनांचा लाभ घेता येत नाही. आदिवासी समाज बांधवांच्या उन्नतीसाठी सर्व योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची मनीषा आव्हाळे यांचे कामकाज युद्धपातळीवर सुरू असल्याचे चित्र पहायला मिळते.
आदिवासी विकास विभागाच्या योजना कोणकोणत्या आहेत पहा
★अनु. जमातीचा मुला / मुलीसाठी शासकीय वसतिगृह सुरु करणे
★अनु. जमातीच्या मुला / मुलींकरीता शासकीय व अनुदानित आश्रमशाळा सुरु करणे.
★ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना
★भुमिहिन अनु. जमातीच्या शेतमजूर कुटुंबासाठी स्वाभिमान व सबलीकरण योजना
★अनु. जमातीच्या शेतकर्यांना वीजपंप/तेलपंप पुरविणे
★अनु. जमातीच्या शेतकर्यांना सिंचनासाठी एचडीपीई पाईपचा पुरवठा करणे
★भारत सरकार शिष्यवृत्ती प्रदाने योजना
★व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या अनु. जमातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणे.
★इयत्ता ८ वी ते १० वी मधील अनु. जमातीच्या अपंग विध्यार्थ्याकरिता शिष्यवृत्ती योजना
★स्वर्णजयंती पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना
★राजीव गांधी अपघात विमा योजना
★आश्रमशाळेतील विध्यार्थी मृत्यूनंतर पालकासाठी सानुग्रह अनुदान देण्याची योजना
★कन्यादान योजना योजना
★खावटी कर्ज योजना
★पारधी समाजासाठी योजना
★विशेष केंद्रीय सहाय्य योजना
★अनु. जमातीच्या कुटुंबाकरीता घरकुल योजना
★अनु. जमातीच्या कुठुंबाकरीता घरगुती गॉस संचचा पुरवठा योजना



















