नवलबाई बोंदार्डे यांच्याकडून लोकमंगल फाऊंडेशनला धान्य किट सुपूर्द
सोलापूर (प्रतिनिधी) लोकमंगल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गोरगरीब, कष्टकरी आणि विडी कामगारांना अन्नधान्याचे कीट वाटप करण्यात येत आहे. लोकमंगलचा हा उपक्रम पाहून नवलबाई आदिनाथ बोंदार्डे यांनी 350 धान्य किट गरिबांना वाटण्यासाठी लोकमंगलकडे सुपूर्द केले.
कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे कष्टकरी, मजूर आणि विडी कामगारांचे हाल होत आहेत. त्यामुळे सामाजिक बांधलकी म्हणून आ. सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमंगल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सुमारे दीड हजार कुटुंबांना अन्नधान्याचे कीट वाटप करण्यात येत आहे. लोकमंगलचा हा आदर्शवत उपक्रम पाहून नवलबाई बोंदार्डे यांनी 350 किट गरिबांना वाटण्यासाठी लोकमंगलकडे सुपूर्त केले. रविवारी त्यांच्या हस्ते धान्य किटचे वाटप करण्यात आले.



















