सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावर आमदार विजयकुमार देशमुख यांना जवळजवळ दोन वर्ष झाले आहेत. त्यामुळे इतरांना संधी मिळावी म्हणून आमदार विजयकुमार देशमुख यांनी सभापती पदाचा राजीनामा द्यावा यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी आग्रह धरला आहे, याच पार्श्वभूमीवर मंगळवारी आमदार विजयकुमार देशमुख हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांनी त्यांना याविषयी छेडले.
मालक बाजार समिती सभापती पदाचा आपण राजीनामा देणार आहात का? आपल्याकडे ज्येष्ठ नेत्यांची मागणी होत आहे, परत अविश्वास ठरावाचा नियोजन सुरू असल्याची चर्चा आहे? असे प्रश्न केले असता माझ्याकडे कोणीही राजीनामा द्या असे म्हणाले नाही असे सांगतानाच आणून दाखवा की माझ्यावर मग अविश्वास असे थेट आव्हान आमदार देशमुख यांनी दिले.
2018 मध्ये बाजार समितीची निवडणूक झाली त्यानंतर पहिल्या वर्षी माजी आमदार दिलीप माने हे सभापती झाले, पुढील वर्षी आमदार विजयकुमार देशमुख यांना सभापती करण्यात आले, विजयकुमार देशमुख यांना एक वर्षाचे सभापती पद देण्यात आले होते मात्र त्यांनी आता जवळपास दोन वर्ष झाले सभापती पदाचा राजीनामा दिला नाही, उपसभापती श्रीशैल नरोळे यांना तर तात्काळ पदावरून काढावे अशी मागणी आहे.
दरम्यान माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठे, जिल्हा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सुरेश हसापुरे या तीन नेत्यानी विजयकुमार देशमुख यांची भेट घेऊन त्यांना राजीनामा देण्याची मागणी केली होती त्यावर देशमुख यांनी कळवतो अशी भूमिका मांडली जर देशमुख हे राजीनामा देणार नसेल तर आम्हाला विचार करावा लागेल असा इशाराही काका साठे यांनी दिला आहे,
सिद्धेश्वर देवस्थान यात्रेचे मानकरी असणारे विजयकुमार देशमुख हे दिलेला शब्द का पाळत नाहीत त्यांना नेमका खुर्चीचा मोह आवरेना की इतर कोणत्या गोष्टीचा? असा सवाल एका नेत्याने उपस्थित केला आहे.
श्रीशैल नरोळे हे तर सिद्धाराम म्हेत्रे यांच्या कोट्यातून उपसभापती झाले मात्र ते म्हेत्रे यांचाही शब्द पाळत नाहीत बैठकीला बोलावल्यावर येत नाहीत मार्केट कमिटी मध्ये एवढी माया काय आहे? या सभापती उपसभापती राजीनामा न देण्यामागे आर्थिक व्यवहार दडलेला आहे का? असे एक ना अनेक सवाल सध्या उपस्थित होत आहेत. जर सिद्धाराम म्हेत्रे, दिलीप माने, काका साठे, सुरेश हसापुरे यांनी ठरवले तर निश्चित बाजार समिती सभापती पदावर अविश्वास ठराव येऊ शकतो हे सुद्धा तेवढेच खरे आहे.




















