जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी गुरुवारी बैठक लावली होती या बैठकीला मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजय सिंह पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय कुमार राठोड यांच्यासह जिल्ह्यातील शिक्षक संघटनेचे मच्छिंद्रनाथ मोरे शिवानंद भरले रामचंद्र बिराजदार विजय वाघमारे अरुण नागणे, अनिल कादे, अमोगसिद्ध कोळी एजाज शेख, दावलसाब नदाफ ,तोरपा चव्हाण, बसवराज राऊत राजकुमार राऊत नवनाथ धांडोरे अमजद इनामदार रविराज खडाखडे, हरीश कडू राजदत्त रासोलगीकर, यांच्यासह उपशिक्षणाधिकारी गटशिक्षणाधिकारी यांची उपस्थिती होती, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी यापुढे जिल्हा परिषदेचा शिक्षक कामाच्या वेळेत जिल्हा परिषदेमध्ये येऊ नये असा आदेश काढला त्यामुळे आता शिक्षक संघटनांची भूमिका काय असेल याकडे लक्ष होते या बैठकीला विशेष करून पोलिसांचा बंदोबस्तही आला होता, पोलीस शिवरत्न सभागृहात थांबून होते त्याच वेळी सीईओ दिलीप स्वामी यांनी पोलिसांना पाहून अरे तुमची काय गरज नाही हे सर्व शिक्षक आहेत आमचे गुरुजन ,हे काय मारामारी करणार नाहीत तुम्ही जाऊ शकता असे सांगितल्यास पोलीस तिथून बाहेर पडले……..
यावेळी शिक्षकांनी जिल्हा परिषदेत का येऊ नये असा प्रश्न उपस्थित केला तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी आपल्या समजुतदारीच्या भाषेत समजावत वेळप्रसंगी कारवाई करण्याची तंबीही दिली. तेव्हा उपस्थित सर्व संघटनांच्या नेत्यांना ते पटले.
यावेळी शिक्षकांच्या पगारी संदर्भातील विषय सेवापुस्तकातील विषय समन्वयाच्या चर्चेतून मार्गी लागल्याचे पाहायला मिळालं दरम्यान स्वामी यांनी आता यापुढे सेवा पुस्तक क्यू आर कोड द्वारे ऑनलाइन पद्धतीने प्रत्येकाला पाहायला मिळेल अशी संकल्पनाही यापुढे राबवणार असल्याचे सांगितले.