पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ मधील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक येत्या 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी व्यक्त केला. स्मारक समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्या उपस्थितीत समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस, सदस्य बाळासाहेब बंडगर, बाळासाहेब शेळके, चेतन नरोटे, यांच्यासह इतर सदस्यांची उपस्थिती होती.
बैठकीनंतर पालकमंत्री भरणे यांनी माहिती दिली अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी नऊ कोटीचा अपेक्षित आहे त्यापैकी दोन कोटी विद्यापीठ देणार असून सात कोटी शासनाकडून मागणी करणार आहोत. येत्या 31 मे पर्यंत हे स्मारक पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली याच वेळी पत्रकारांनी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर स्मारक उभारणीसाठी प्रस्ताव तयार असून निधी मंजुरी घेतली होती मात्र त्याच्या कामाचं काय झालं असा प्रश्न केला असता पालकमंत्र्यांना महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकाबाबत माहितीच नसल्याचे समोर आलं याबाबत माहिती घेऊन पाठपुरावा करेन असे ते म्हणाले.


















