सांगोला : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अभ्यासू सदस्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या गटाच्या विश्वासू सहकारी श्रीमती स्वाती कांबळे जि. प. सदस्या जवळा गट तथा सदस्या शिक्षण, आरोग्य, नियोजन समिती सोलापूर यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी बिनविरोध निवड झाली असून सदर निवडीचे पत्र सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव प्रा.. डॉ. वि. भा. घुटे यांनी दिले. बिनविरोध निवड झालेचे समजताच जवळा जि. प. गटात फटाक्याची अतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला.
स्वातीताई कांबळे यांनी 2017 मध्ये जवळा जि. प. गटातून विजयी झाल्या आहे. मुळातच समाजसेवेची आवड असल्याने त्यांनी जवळा जि. प. गटातील गावासाठी भरीव निधी आणण्यासाठी प्रयत्न करीत असतात. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, दलित वस्ती सुधार योजना, 3054, 5054, अंतर्गत ग्रामीण भागात रस्त्यासाठी निधी, प्राथमिक आरोग्यकेंद्र उपकेंद्र, जि. प. प्राथमिक शाळा, पशुसंवर्धन दवाखाना, जनसुविधा योजना, तिर्थक्षेत्र विकास योजना, बांधारे नाला खोलीकरण रुंदीकरण, हायमास्ट, पेव्हींग ब्लॉक, वैयक्तिक लाभाच्या समाजकल्याण महिला बालकल्याण कृषी विभाग अंगणवाडीसाठी निधी तालुक्यातील दुर्धर आजारी लोकांना निधी, पाणलोट विकास क्षेत्र निधी, अशा अनेक ठिकाणी प्रभावीपणे काम करून कोट्यावधी रुपयांचा निधी सोलापूर जिल्हापरिषद व जिल्हा नियोजन मंडळ यांच्याकडून मिळवून सांगोला तालुक्यासह जवळा जि. प. गटातील गावांना विकासकामासाठी दिला आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना वेगवेगळ्या कमिटीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. जवळा जि. प. गट निवडणूक वगळता त्या शिक्षण समिती, आरोग्य समिती, नियोजन समिती सोलापूर, सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य म्हणून बिनविरोध निवडूण आल्या आहेत. त्यांच्या निवडीने तालुक्यांच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा मिळाला आहे. सदर निवडीसाठी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण मंगळवेढा, सविताराजे भोसले करमाळा, वसंतनाना देशमुख पंढरपूर, रणजितसिंह शिंदे माढा, राणी वारे करमाळा, उषा सुरवसे उत्तरसोलापूर, यांचेसह विद्यामान जि. प. अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, शिक्षणअधिकारी राठोड यांनी विशेष प्रयत्न केले.