सोलापूर ! जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते, नियोजन भवनात त्यांची बैठक होती, वेळ साडेबारा-एक ची मात्र मामांना यायला अडीच पावणे तीन वाजले, त्यापूर्वी त्यांना निवेदन देण्यासाठी नागरिक, विविध संघटना, संस्था, राजकिय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते, त्याचवेळी माजी मंत्री आनंदराव देवकते यांचे चिरंजीव माजी सभापती अशोक देवकते हे आपले पुत्र उपसरपंच सतीश देवकते हे आपल्या भागातील विविध विकास कामांसाठी निधी व ओढा तसेच सीना नदीवरील बंदलगी बंधारा दुरुस्त करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यासाठी आले होते , याचवेळी पालकमंत्री आले आणि त्यांनी बाहेर थांबलेल्याची निवेदन स्वीकारली, त्यावेळी देवकते पिता पुत्रांने निवेदन दिले, पालकमंत्र्यांनी कागद हातात घेताच पोलिसांनी अशोक देवकते यांना बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला मात्र मामांनी ते पाहिले आणि अरे ते देवकते साहेबांचे चिरंजीव आहेत म्हणून जवळ घेतले आणि फोटो काढला.
काय होता नेमका प्रकार पहा हा व्हिडीओ. ..


















