मुंबई : गेल्या चार ते पाच दिवसांपासून सोशल मिडीयावर कोणतेही शहानिशा करता एक सर्रास मेसेज फिरतोय, याला चांगले लोक सुद्धा बळी पडत असल्याने स्वतः टाटा ग्रुपच्या वतीने वतीने ट्विट करून इशारा देण्यात आलाय. या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, टाटा समूह किंवा त्याची कोणतीही कंपनी अशा प्रकारे कोणताही जाहिरात्मक मेसेज करत नाही. त्यामुळे तुमची दिशाभूल करून तुम्हाला कोणी जाळ्यात ओडत असल्यास ते टाळा आणि लोकांनाही असे मेसेज फॉरवर्ड करू नका.
सोशल मिडीयावर फिरणाऱ्या या जाहिरात्मक मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, टाटा समूहानं 150 वर्षे पूर्ण केल्याबद्दल कंपनीकडून एक सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात भाग घेणाऱ्यांना टाटा नेक्सन ईव्ही वाहन मिळणार आहे. या मेसेजबद्दल टाटा समूहाने आता सतर्कतेचा इशारा दिलाय. आमच्याकडून अशा प्रकारचा कोणताही प्रचारात्मक उपक्रम आयोजित केला गेला नाही. त्यामुळे फेक मेसेजपासून सावध राहा… दरम्यान मुंबईच्या सायबर क्राईम ब्रांच कडून सुद्धा या प्रकरणी नागरिकांना आवाहन करण्यात आले असून अशा फेक मेसेजला कोणीही बळी पडू नये त्याच्यावर क्लिक करून आपली वैयक्तिक माहिती भरू नका असे सांगण्यात आले आहे.


















