राज्याचे दुग्धविकास, पशुसंवर्धन व क्रीडा मंत्री सुनील केदार हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते, मंत्री केदार हे काँग्रेसचे असल्याने तिथे आमदार प्रणिती शिंदे या सुध्दा विश्रामगृहावर आल्या, यापूर्वी कधी आमदार ताई रेस्ट हाऊसवर दिसल्या नाहीत, त्यांनी सुनील केदार यांचे सपत्नीक स्वागत केले, यापूर्वी माजी आमदार तथा दूध संघाचे अध्यक्ष दिलीप माने हे मंत्री केदार यांच्या स्वागताला आपल्या समर्थकांसह येऊन थांबले होते, केदार हे आल्यावर त्यांचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी विनोद भोसले, मनोज यलगुलवार यांच्यासह स्वागत केले, निवेदने स्वीकारली, तोपर्यंत दिलीप माने हे बाजूला थांबले होते, त्यांना सुनील केदार यांनी पाहताच अरे दिलीपराव लांब थांबलात, तुम्ही माझे मित्र आहेत, आपण एका बेंचवर बसून प्रश्न मांडलेत, सत्ता येते जाते, तुम्ही आत बसा मी येतो असे केदार म्हणाले,
तेव्हा माने आत गेले, मंत्री केदार आत आले तेव्हा त्याचवेळी आमदार प्रणिती शिंदे या आत आल्या, तेव्हा केदार यांनी मोठ्या रिस्पेक्ट देत बसण्यास सांगितले. त्याचवेळी आमदार प्रणिती ताई व दिलीप माने एकमेकांच्या शेजारी बसले,
तेव्हा ताई-मालकांनी हसत-खेळत गप्पा मारल्या, हे टिपण्यासाठी तिथं उपस्थित असलेले कॅमेरे सरसावले. असे वाटत नव्हते की विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते
एकमेकांच्या विरोधात लढले, एकमेकांवर टीका केली असेल, नुकतेच लॉकडाऊन शिथील करून व्यापार सुरू करण्याच्या मागणीसाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी राज्य पातळीवर प्रयत्न केले, दिलीप माने यांनी निवेदने दिली, आंदोलन केले, अटक करून घेतली, अनेकांनी प्रयत्न केले त्यात काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, किंवा भाजप या सर्वांचे प्रयत्न आहेत, मग माझ्यामुळे झाले म्हणून श्रेय घेण्याचे राजकारण सुरु आहे, अशातच एकमेकांच्या विरोधात लढलेले हे दोन नेत्यांनी एवढया मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यानंतर आमदार ताई या केदार यांच्या पत्नींशी गप्पा मारल्या तेव्हा माने आणि केदार यांच्यात बराच वेळ गुफ्तगु झाले, दुध संघात सध्या सावळा गोंधळ सुरू आहे, त्याची निश्चित चर्चा झाली असावी.
















