मुंबई : पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन यांचे वतीने माझी वसुंधरा अभियान 3.0 सन 2022-23 मध्ये राज्यात राबविण्यात आले. या अभियानमध्ये 10हजार लोकसंख्या पेक्षा अधिक लोक संख्या असणाऱ्या ग्रामपंचायत विभाग मध्ये मंद्रूप ग्रामपंचायतला राज्यात प्रथम पुरस्कार पुरस्कार मिळाला आहे.
पृथ्वी अग्नी वायू जल आणि आकाश या पंचतत्वावर आधारित विविध योजना आणि कार्यक्रम ग्रामपंचायत मंद्रूप यांनी उत्कृष्ठ पद्धतीने पार पाडले आहे. मंद्रूप ग्रामपंचायतला मागील वर्षी दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. या वर्षी पुन्हा एकदा नेटाने अभियान राबवून राज्यात पहिला क्रमांक प्राप्त केला आहे बक्षीस रक्कम रुपये एक कोटी पंचाहत्तर लाख(1.75) जाहीर झाले.
पुरस्कार वितरण कार्यक्रम दिनांक 5 जून 2023 रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी जमशेद भाभा थियेटर मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते. हा पुरस्कार वितरण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले. सदरच्या सोहळ्यासाठी मंद्रूप ग्रामपंचायातचे ग्रामविकास अधिकारी नागेश जोडमोटे, सरपंच अनिता कोरे, विस्तार अधिकारी कृषी सचिन चव्हाण, महेश रगटे, माजी सभापती आप्पाराव कोरे, उपसरपंच भगवान व्हणमने, भाग्यश्री जोडमोटे यांनी उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संजय गायकवाड, मार्टिन कॅन्सुलेट जनरल ऑफ स्विस, प्रधान सचिव प्रवीण दराडे उपस्थित होते.
मंद्रुपकरांचा सोलापूर जिल्ह्यास अभिमान – सिईओ दिलीप स्वामी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. मंद्रुपकरांचा सोलापूर जिल्ह्यास अभिमान -असल्याची प्रतिक्रिया सिईओ दिलीप स्वामी यांनी दिली. जिल्हात माझी वसुंधरा अभियानाचे वातावरण तयार करण्याचे काम ग्रामपंचायत विभागाने केले. मंद्रुपकरांनी त्यास साथ दिली. पाच तत्वे जोपासली. दक्षिण सोलापूर पंचायत समितीची टीम, मंद्रुप ची ग्रामपंचायत, ग्रामविकास अधिकारी व सर्व पदाधिकारी यांचे खुप खुप अभिनंदन करीत असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. ज्या ग्रामपंचायती या मध्ये सहभागी झाल्या होत्या त्यांनी उमेद सोडू नये. जिल्ह्सात एक कुटुंब एक वृक्ष या प्रमाणे पाच लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प आज पर्यावरण दिनी घेणेत आला असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
मंद्रुपला पावणे दोन कोटी रूपये बक्षीस – उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे
चांगले काम केले तर बक्षीस मिळू शकते याचा प्रत्यय तिसऱ्यांदा आला आहे. नाशिक मध्ये काम करताना पिपंळगाव बसवंत ही राज्यात पहिली आली होती. सवंग दोन वर्षे पहिली आली त्याच धर्तीवर सोलापूर जिल्ह्यात माझी वसुंधरा अभियान राबविले. मंद्रुप ने राज्यात पहिला क्रमांक पटाकविला. सोलापूर जिल्हा परिषदे साठी व जिल्ह्सास अभिमाना स्पद असून सर्वाधिक १ कोटी ७५ लक्ष रूपयाचे बक्षीस मंद्रुप ग्रामपंचायतीने पटकाविले आहे. सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचे अभिनंदन करत असताना सर्व ग्रामस्थ, स्थानिक संस्था, माध्यमे यांचे देखील अभिनंदन करीत असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी सांगितले.




















