सोलापूर : अहमदनगर महापालिका आयुक्तपदी पंकज जावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंकज जावळे सध्या अकोला महानगरपालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी सोलापूर महापालिकेत सहाय्यक आयुक्त, उपायुक्त तर जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून काम केले आहे. सोलापूर शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी यांनी जावळे यांची अहमदनगर पालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश काढले आहेत.
सोलापूरचा ढाण्या वाघ आता ठाण्यात गाजणार ; ॲड. अमित आळंगे यांची….
सोलापूरचा ढाण्या वाघ आता ठाण्यात गाजणार ; ॲड. अमित आळंगे यांची.... येथील बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अमित आळंगे यांची ठाण्याच्या...