सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पंढरपूर इथल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात शेतकरी मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात पवार यांनी कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचे कौतुक केले.
पवार म्हणाले, एक दिवस अभिजीत पाटील माझ्याकडे आले, त्यांनी सांगोला कारखाना घेण्याची इच्छा व्यक्त केली. मी म्हणालो अरे अभिजीत तुला झाले तर काय? कारखान्यांमध्ये काही शिल्लक आहे का? मात्र अभिजीत पाटील यांनी कारखाना घेण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली आणि शेवटी मी घेऊन टाक असा सल्ला दिला. त्यांनी तो घेतला आणि चांगल्या पद्धतीने चालवत आहेत. विठ्ठल सहकारी कारखान्यात ही त्यांनी आता शेतकऱ्यांना 2300 चा दर दिला आहे आणि पुढे आणखी दोनशे रुपये देणार आहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे असे सांगत कोणतेही कर्ज न काढता शेतकऱ्यांना पैसे द्या असा सल्ला दिला.
वसंत दादा पाटील, यशवंतराव मोहिते व औदुंबर अण्णा या सर्वांची ओळख नवीन कारखानदारी सुरू करण्याची आहे मात्र अभिजीत पाटील यांची ओळख आता बंद पडलेले दुकान चालू करायची झाली आहे एवढेच नाही तर गिर्हाईकाला परवडेल अशा पद्धतीने ते दुकान चालवतात अशा शब्दांमध्ये पवार यांनी पाटील यांच्या कामाचे सर्वांसमोर कौतुक केले. पहा नक्की काय म्हणाले शरद पवार…



















