जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास आपल्या कार्यालयात कामकाज करत होते त्याच वेळी काही पत्रकार तसेच जिल्हा परिषद सदस्य एडवोकेट सचिन देशमुख हे त्यांच्या कार्यालयात होते याच वेळी त्यांना फोन आला या फोनमध्ये सुमारे दहा मिनिटे चर्चा झाली, चर्चेनंतर स्वामी यांनी पत्रकारांना सांगितले की हा फोन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे covid-19 सल्लागार डॉक्टर दीपक म्हैसेकर यांचा होता ,म्हैसेकर हे काही दिवसांपूर्वी सोलापूर दौऱ्यावर आले होते त्यांनी कोरूना लसीकरणाचा आढावा प्रशासनाकडून घेतला होता त्यानंतर त्यांनी काही वेळ जिल्हा परिषदेमध्ये येऊन एका कार्यक्रमाला हजेरी लावली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आपल्या संकल्पनेतून राबवलेल्या माझे गाव कोरुनामुक्त गाव या अभियानाची माहिती दिली तसेच त्यांनी जिल्हा परिषदेच्या विविध उपक्रमाचे बुकलेट म्हैसेकर यांना दिले होते ,हे बुकलेट वाचल्यानंतर म्हैसेकर यांनी माझे गाव करोनामुक्त गाव या संकल्पनेचे कौतुक केले तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक विविध प्रकारचे उपक्रम राबवतात ,वेगवेगळ्या संकल्पना राबवतात त्या संकल्पना राज्यस्तरावर राबवण्याचे नियोजन करण्याचा विचार म्हैसेकर यांनी बोलून दाखवला. यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने मिशन 2022 राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील विविध शाळातील शिक्षकांच्या संकल्पना , अविष्कार या जिल्हापातळीवर राबविण्याचा संकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी बोलून दाखवला. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा परिषदेचा पदभार घेतल्यापासून केवळ दोन ते अडीच महिन्यातच जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण, आरोग्य, शिक्षण विभागात विविध संकल्पना समोर आल्या आहेत. जिल्ह्याचे दौरे त्यांनी सुरू केले आहेत मात्र ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठका यात बराच वेळ जात असल्याने दौरे करण्यासाठी त्यांना वेळ मिळत नसल्याचे चित्र आहे.