चतुर्थश्रेणी महसूल कर्मचाऱ्यांची अनुकंपा भरती तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी चतुर्थ श्रेणी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने साखळी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सोमवार 23 ऑगस्टपासून या आंदोलनाला सुरूवात झाली असून पहिल्या दिवशी काळ्या फिती लावून कर्मचारी काम करत आहेत.
जिल्हा प्रशासनातील विविध कार्यालयात जाऊन चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना आंदोलन तीव्र करण्यासाठी प्रयत्न करत असून दरम्यान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंतनु गायकवाड यांनी आपल्या मागण्यांची अधिक माहिती देताना आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली

















