सोलापूर : तौफिक शेख यांचे चिरंजीव अदनान शेख यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला, त्यानंतर 7 सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस. आपल्या लाडक्या लेकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार सोहळा आयोजित केला. त्यांनी जरी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला नसला तरी कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्याच नेत्यांची मांदियाळी होती.
तौफिक शेख, आरिफ शेख हे बंधू प्रत्येक कार्यक्रमाला सर्वाना प्रेमाने निमंत्रण देतात, ताज सोशल ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी मोठं संघटन उभं केलं आहे. हा सत्कार सोहळा नव्हता तर अदनान शेख याच खरं राजकिय लॉंचिंग होतं, कार्यक्रमात अदनानच्या स्वभावाचं कौतूक झालं, त्यांच्या संघटन कौशल्याच कौतूक झालं, तू लवकरच महापालिकेत नगरसेवक म्हणून जाशील, वडिलांप्रमाणे लोकांची सेवा कर असे आशीर्वाद व शुभेच्छा नेत्यांनी दिल्या पहा हे व्हिडीओ



















