सोलापूर : जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत सांगोला तालुक्यातील घेरडी गावच्या व्यापारी गाळ्यांचा विषय सभेच्या अजेंड्यावर होता मात्र या विषयाला घेरडी जिल्हा परिषद गटाचे सदस्य तथा विद्यमान कृषी सभापती अनिल मोटे यांनी विरोध केला होता त्यानंतर मोटे आणि झेडपी सदस्य अतुल पवार यांच्यात चांगलाच वाद झाला. मोटे यांनी या विषयाला विरोध का केला याचे स्पष्टीकरण सोमवारी पत्रकार परिषदेत दिले.
त्याचबरोबर अतुल पवार हे आगामी जिल्हा परिषद निवडणूक ही जवळा गटातून लढवणार आहेत यावर बोलताना मोटे यांनी आपल्या एखतपुर गटात किती विकास केला हे पहिले पहावे निवडणुकीच्या तोंडावर येऊन मुरमीकरण करणे म्हणजे विकास आहे का? जवळ्याची जनता सुज्ञ आहे अशा शब्दात त्यांनी अतुल पवार यांच्यावर तोफ डागली पहा सभापती मोटे काय म्हणाले…


















