सोलापूर ! 1 जुलै माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा केला जातो, सोलापूर जिल्हा परिषदेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण सभागृहात कृषी दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी झेडपी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे होते, कृषी सभापती अनिल मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती,
कार्यक्रमाची वेळ सकाळी साडे दहाची होती, मात्र साडे अकरापर्यंत अध्यक्ष अनिरुद्ध अण्णाचा पत्ता नव्हता, अध्यक्ष आपल्या शासकीय निवासस्थानात थांबून होते बराच वेळ फोना फोनी झाले त्यांनी कुणाचेच फोन उचलले नाहीत, अखेर ते आले. कार्यक्रम सुरू झाला, उद्घाटन झाले, प्रास्ताविक झाले साधा कॅमेरामन फोटो काढण्यासाठी नव्हता, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी असतानाही जिल्हा माहिती कार्यालयातील ना फोटोग्राफर होता ना व्हिडीओ शूटिंग करणारा.
कार्यक्रमात अध्यक्षांची नाराजी स्पष्ट दिसत होती, अशातच संपूर्ण कार्यक्रम पार पडला सर्व मान्यवर कार्यक्रम संपून जिल्हा परिषदेच्या पोर्चमध्ये आले त्यानंतर जिल्हाधिकारी निघून गेले नंतर अध्यक्ष अनिरुद्ध अण्णा, स्वामी साहेब, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, प्रभारी जिल्हा कृषी अधिकारी नंदकुमार पाचकुवडे, हे एकत्र थांबले असताना स्वामी यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला आणि अनिरुद्ध अण्णा त्यांच्यासमोर दिलगिरी व्यक्त केली.
त्यानंतर अध्यक्ष कांबळे यांनी पाचकुडवे यांना आपल्या केबिनमध्ये बोलावून नियोजन नसलेल्या आणि समन्वय नसलेल्या या कार्यक्रमाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. या कार्यक्रमात समन्वयाचा प्रचंड अभाव दिसून आला 1 जुलै हा कृषी दिन म्हणून प्रसिद्ध आहे या दिनाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेमध्ये होता, कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे होते मात्र त्यांना 30 जून रोजी रात्री च्या सुमारास निरोप दिला गेला यावरून या दोन कृषी कार्यालयामध्ये नियोजन नसल्याचे सिद्ध झाले.



















