सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीचे पदाधिकारी आज जाहीर झाले आहेत. युवक जिल्हाध्यक्षपदी करमाळ्यातील अभिषेक आव्हाड तर सोलापूर शहराध्यक्षपदी सुहास कदम यांची निवड आज जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीच्या सोलापूर जिल्हा सोशल मिडिया विभाग अध्यक्षपदी बापूसाहेब पाटील यांची निवड झाली आहे.
राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी आव्हाड व कदम यांच्या निवडी जाहीर केल्या आहेत. सोशल मिडियाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी जिल्हाध्यक्ष पाटील यांची निवड जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा नियुक्ती पत्र देऊन सन्मान केला.
अभिषेक आव्हाड व सुहास कदम हे अनेक वर्षांपासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी आघाडीमध्ये काम करत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्यासोबतचे आमदार २ जुलैला राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. तेंव्हापासून आतापर्यंत पदाधिकारी निवडीचा विषय प्रलंबित होता. शहर व जिल्हा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अद्यापही प्रलंबित आहेत. लवकरच शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षसाठी मुलाखती झाल्या असून पदाधिकाऱ्यांची घोषणा बाकी आहे. लवकरच या निवडींच्या घोषणेलाही मुर्हूत मिळण्याची शक्यता आहे.