“मंत्रीगट समितीच्या अध्यक्ष पदी असलेले अमागासवर्गीय मंत्री अजित पवार यांनी मागासवर्गीयांच्या विरोधात निर्णय घेतल्याने त्यांना ताबडतोब निष्काषित करून मागासवर्गीय मंत्री यांची नियुक्ती करावी.”
मागासवर्गीय आरक्षण रद्दचा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी राज्यात सर्वत्र मागासवर्गीय कर्मचारी संघटनांनी निवेदने दिली.
सोलापुरात आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले यावेळी
शामराव जेवजाळ, राजा सोनकांबळे, कमलाकर बनसोडे,बापूसाहेब सदाफुले,पंडित गायकवाड, राजेंद्र शिंदे, शंतनू गायकवाड, विजयकुमार कांबळे, यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती,
मागासवर्गीयांचे 7/5/2021 च्या शासन निर्णयाद्वारे रद्द केलेले 33% आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या 17/5/2018, 5/6/2018 व केंद्र सरकारच्या 15/6/2018 च्या आदेशाप्रमाणे न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदोन्नती देण्यात यावी, मंत्रालयातील अधिनस्त अधिका-यांनी षडयंत्र करून मागासवर्गियांची पदोन्नती बंद करण्यास कारणीभूत असलेल्यांवर अॅट्रॉसिटी तसेच आरक्षण अधिनियम कलम 8 अन्वये गुन्हा दाखल करावे, यासह इतर मागण्या आहेत,
आरक्षण हक्क बचाव समितीने मोठ्या मोर्चाचे आयोजन केले होते त्यासाठी जिल्हाभरातून विविध मागासवर्गीय कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जमा झाले मात्र पोलिसांनी आंदोलनाला परवानगी न दिल्याने शेवटी निवेदन द्यावे लागले.


















