सोलापूर : भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या हे रविवार 17 ऑक्टोबर रोजी सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.त्यांनी शांती सागर मंगल कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या शनिवारच्या पत्रकार परिषदेवर भाष्य केले, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बेनामी मालमत्तेत त्यांनी प्रकाश टाकला, अजित पवारांच्या बेनामी मालमत्तेत बहिणी व मेव्हण्यांचा हिस्सा असल्याचा आरोप त्यांनी कागदोपत्री केला. ठाकरे सरकारचे रिमोट कंट्रोल असलेले शरद पवारांनी माझ्या आरोपाला उत्तर द्यावे, हे कागदोपत्री पुरावे मी ईडी, उच्च न्यायालय, सीबीआय कडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारने केलेले भ्रष्टाचार ही डकेती असल्याची टीका केली पहा किरीट सोमय्या यांनी पवार कुटुंबियांवर कोणते आरोप केले ते

















