सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सोमवारी दौऱ्यावर आहेत. सकाळी कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन याचे उद्घाटन झाले या कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सुद्धा उपस्थित होते या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी पालकमंत्री विखे पाटील यांना गाठले. यावेळी पालकमंत्र्यांसोबत सुशीलकुमार शिंदे हेही होते.
सुरुवातीला माध्यमांनी या नर्सिंग इन्स्टिट्यूट बद्दल माहिती विचारली. त्यानंतर पत्रकारांनी राज्यामध्ये सध्या विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि खासदार संजय राऊत यांच्यातील सुरू असलेल्या वादावर प्रश्न केला. विषय महाविकास आघाडीचा येतोय असे लक्षात येताच पाठीमागे थांबलेले सुशीलकुमार शिंदे यांनी प्रसंगावधान राखत विखे पाटील यांची पाठ सोडली. या प्रश्नाला विखे पाटील यांनी काय दिले उत्तर आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या चेहऱ्याचे हावभाव कसे झाले आणि ते लगेच बाहेर पडले तो व्हिडिओ पहा


















