मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास अजून 100 कोटी रुपये मंजूर करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते इरफान शेख यांनी गुरुवारी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेऊन पत्र दिले, ही मागणी उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी त्वरित मंजूर केली आणि लवकरच वाढीव निधी दिला जाईल असे आश्वासन दिले.
यानंतर इरफान शेख यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचीही भेट घेऊन त्यांना निवेदन दिले या निवेदनामध्ये विशेष करून सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये दोन सदस्यीय प्रभाग पद्धती करावी अशी मागणी शेख यांनी केली आहे
तसेच या शिष्टमंडळाने राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचीही भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली इरफान शेख यांच्या शिष्टमंडळात गफुर शेख, अल्पसंख्यांक अध्यक्ष, अल्ताफ कुरेशी, याकुब शेख यांचा समावेश होता.























